motivational blog

MBBS, BAMS करिता प्रवेशासाठी NEET परीक्षेच्या निकालानंतर काय तयारी करावी? तसेच कोणते कागदपत्रे तयार ठेवावीत?

देशभरातील आरोग्यविज्ञान शाखेतील एमबीबीएस, बीडीएससह बीएएमएस, बीएचएमएस व उर्वरित शाखातील प्रवेशासाठी फक्त ‘नीट २०२०’ ही एकच परीक्षा घेण्यात येणार असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.nta.ac.in संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१९पर्यंत उपलब्ध आहेत. देशपातळीवर परीक्षा एकाच दिवशी पेन अँड पेपर पद्धतीने घेण्यात येणार असून, परीक्षेचा निकाल ४ जून २०२० रोजी लागेल. निकालानंतर देशपातळीवरील एमबीबीएस व बीडीएस शाखांची प्रवेशप्रक्रिया एमसीसी-मेडिकल कौन्सिलिंग कमिटीतर्फे व उर्वरित ‘आयुष’ मंत्रालयातर्फे राबविण्यात येणार आहे. देशभरातील प्रत्येक राज्यातील प्रवेशप्रक्रिया संबंधित राज्यातर्फे पार पाडण्यात येते.

राज्यस्तरीय कोटा
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विज्ञान शाखेतील शासकीय, शासनअनुदानित एमबीबीएस शाखेच्या सुमारे २४ संस्थांमधून ४२८० जागा, खासगी महाविद्यालयातील १७ संस्थांमधून २१२० जागा उपलब्ध होतात. बीडीएस शाखेतील शासकीय चार संस्थांमधून २९४ जागा, खासगी २६ महाविद्यालयातून २३५० जागा, तसेच बीएएमएस शासकीय २१ संस्थांतून १६६२ जागा, खासगी ५४ संस्थांतून ३४७० जागा उपलब्ध होतात. बीएचएमएस शाखेच्या खासगी ५४ संस्थांतून ४१८० जागा तसेच उर्वरित शाखांतील प्रवेशासाठी सीईटी सेल- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यातर्फे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ‘नीट’ परीक्षेच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेचे माहितीपत्रक व संपूर्ण वेळापत्रक सीईटी सेलच्या www.mahacet.org संकेतस्थळावर जून २०२०मध्ये उपलब्ध होते.

महत्त्वाचे टप्पे
नीट २०२०मधून प्रवेशासाठी पात्रता प्राप्त केलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रथम रजिस्ट्रेशन म्हणजेच नावनोंदणी केली जाते. मागील वर्षी राज्यातून सुमारे २ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तरी प्रत्यक्षात सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते.

नावनोंदणीनंतर कागदपत्रांची तपासणी पार पाडली जाते. कागदपत्रांची पडताळणीवेळी ज्यांच्याकडे आरक्षण वगैरेंबाबत कागदपत्रे नसतील त्यांना खुल्या गटात समाविष्ट केले जाते. तपासणीनंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी म्हणजेच मेरीट क्रमांक जाहीर होतो.

संकेतस्थळावरून पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पसंतीक्रम भरून घेतले जातात. एकदाच भरलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेशासाठीच्या आवश्यक फेऱ्या राबविल्या जातात. त्यानुसार जागांचे वाटप झाल्यानंतर प्रत्यक्ष संस्थेत प्रवेश घेणे व पुढील फेरीत चांगल्या प्रवेशाची प्रतीक्षा करणे किंवा प्रवेश आवडला असल्यास तो निश्चित करणे, असे महत्त्वाचे टप्पे असतात.

राज्यस्तरीय आरक्षणाबाबत
राज्यातील आरक्षण व देशपातळीवरील आरक्षण यात मोठा फरक असून, त्यांचे नियमही वेगळे असतात. सद्यःस्थितीत ‘नीट २०२०’ परीक्षेचा फॉर्म भरताना आपण देशपातळीवरील आरक्षणातून नोंदणी करतो म्हणजेच जनरल, ईडब्ल्यूएस जनरल, ओबीसी एनसीएल, एससी, एसटी याममधून नोंदणी करतो. ‘नीट २०२०’च्या निकालानंतर राज्यशासनाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील आपल्याला मिळणाऱ्या आरक्षणातून मागणी करावी लागते. आरक्षण नोंदविल्यानंतर कागदपत्रे तपासणीनंतरच आपली मागणी मान्य होते. कागदपत्रांत कमतरता असल्यास आपली मागणी रद्द होऊन सर्वसाधारण (जनरल) गटामधून अंतिम नोंदणी केली जाते.

महाराष्ट्र राज्यस्तरावर अनुसूचित जाती एससी- १३ टक्के, अनुसूचित जमाती एसटी- ७ टक्के, विमुक्त जाती- अ-व्हीजे- ३ टक्के, भटक्या जमाती- ब- एनटीबी अडीच टक्के, भटक्या जमाती- क- एनटीसीसाठी साडेतीन टक्के व भटक्या जमाती- ड- एनटीडीसाठी दोन टक्के, ओबीसी- इतर मागासवर्ग- १९ टक्के, एसईबीसी- मराठा आरक्षण १२ टक्के व ईडब्ल्यू एस- आर्थिक दुर्बल घटकासाठी १० टक्के आरक्षण असून इतरही विशिष्ट आरक्षण असते. जूनमध्ये प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना त्याची नोंदणी करावी लागते

एमएचटी-सीएटी (MHT-CET) :-एमएचटी-सीईटी) महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट हे ऑनलाइन व्यवस्थापन प्रवेश परीक्षा आहे. त्याला एमएएच-एमबीए / एमएमएस-सीईटी परीक्षा देखील म्हणतात. या परीक्षा तांत्रिक शिक्षण संचालनालय आयोजित आहे.. एमबीए / एमएमएस, बीई / बी टेक, एमसीए, बीएचएमसीटी, एम.एचएमसीटी, एमएआरटी, सरकारी इन्स्टिट्यूट, महाविद्यालये, विद्यापीठ किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही खाजगी संस्थेत विविध व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एमएएच-सीईटी आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्याने एमबीए / एमएमएस / पीजीडीबीएम / पीजीडीएम मध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया (सीएपी) केंद्रीकृत केली आहे. बहुविध सत्रांत सक्षम प्राधिकरण विभागात महा-सीईटी परीक्षा प्रमाणित समान-प्रमाणित पद्धतीने वापरली गेली ज्या सर्व सत्रासाठी संबंधित गुण असतात. येथे पुढील पोस्ट व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रवेशासाठी आम्ही एमएएच-सीईटी (एमबीए प्रवेश परीक्षा) विषयी माहितीचे वर्णन करू.

एमएएच-सीईटी परीक्षा नमुना :-

एमएएच-सीईटी परीक्षेत एकूण 200 प्रश्न आहेत. वाटलेल्या वेळ कालावधी 150 मिनिटे (2 आणि अर्धा तास) आहे. सर्व प्रश्न बहुविध उद्देशपूर्ण प्रश्न आहेत. उमेदवाराला निवड योग्य उत्तर करण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रात काही व्यवसायिक शाळा आहेत ज्यांना एमएएच-सीईटी अभ्यासक्रमाचा विचार व मान्य आहे. भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, के. जे. सोमैया इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि रिसर्च, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि अधिक.

वर्षभरातून नवीन अद्ययावत नुसार महाराष्ट्र सोडून महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यात व्यवस्थापन महाविद्यालये प्रवेश मिळण्यास पात्र ठरण्यासाठी सीएमएटी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

(MAH-CET) पात्रता :-

कृपया एमएएच-सीईटीसाठी नवीन पात्रता निकष तपासा:

इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील किमान दहाव्या गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राखीव श्रेणी उमेदवार पात्रतेसाठी 50% गुण आहेत.

अंतिम वर्ष पदवीधर पदवी येणारे विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात.

ज्या उमेदवारांची आधी सीएटी / जीएमएटी / सीएमएटी / एमएटी / एक्सएटी / एटीएमएची पात्रता आहे, ते अखिल भारतीय सीटच्या अटी आणि त्यांच्या पूर्ततेच्या निकषाची उपलब्धता म्हणून प्रवेशासाठी पात्र ठरतात. परीक्षार्थीच्या आधी ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज आहे.

MAH-CET 2018 परिक्षा केंद्र

MAH CET 2018 सर्व भारतातील विविध परीक्षांच्या केंद्रांवर आयोजित केले जाईल. नोंदणी फॉर्मवर उमेदवारांसाठी 3 परीक्षे केंद्रांपर्यंतची निवड दिली जाते, उमेदवाराने ऑनलाइन अर्ज फॉर्मवर कोणत्याही तीन केंद्र

२)नीट (Neet -National Eligibility cum intrance test) :-२०१३ पासून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशपद्धतीत महत्वाचा बदल करण्यात आला आहे होता तो बदल म्हणजे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निकष ठरणारी देशपातळीवर एकत्र प्रवेशपरिक्षा म्हणजेच नीट होय..केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय वैद्यक परिषद आणि सीबीएसई यांनी एकत्रितपणे हा निकष निश्चित केला होता..एमबीबीएस,बीएएमएस,बिडीएस,बीएचएमएस,बीयुएक प्रश्नासाठीएमएस, बीपीटीएच,बीओटीएच,बीएआएसपी,बीपी आणि ओ इत्यादि..कोर्सेसचा यात समावेश आहे..दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाहिरात येऊन फॉर्म्स भरले जातात व एप्रिल महिन्यात प्रवेशपरीक्षा घेतली जाते..

पात्रता:-१२ वी विज्ञान,भौतिक, रसायन व जीवशास्त्रासह पास वय १७ वर्ष पूर्ण..

परीक्षेचे स्वरूप :-या परीक्षेमध्ये १८० प्रश्नांचा एक पेपर ५२० गुणांसाठी असतो (एका प्रश्नाला ४ गुण असतात).. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.. या परीक्षेमध्ये ४ विषयांचा समावेश असतो..तो या प्रमाणे :-भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र, जीवशास्त्र व वनस्पतीशास्त्र..अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या :-National Eligibility Cum Entrance Test

३)आयआयटी-जेइइ :-अधिक प्रतिभावान विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्यासाठीचा एक उत्तम मार्ग म्हणजे आयआयटी सर्व भारतीयांसाठी एकच प्रवेशपरिक्षा घेऊन त्यातील गुणाच्या आधारे विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो ..परीक्षेचे नाव जेइइ(JEE-Joint Entrance Examination) असून सदर परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अर्ज करावा लागतो..यासाठी प्रतिवर्षी सर्वसाधारणपणे ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात IIT मार्फत जाहिरात दिली जाते..१२ वी(विज्ञान)शिकत असणारे विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असतात..या परीक्षेतील मेरीटनुसार iit मध्ये प्रवेश मिळू शकतो..भारतात १९० आयआयटी संस्था आहेत…

आता थोड्या सोप्या भाषेत परीक्षेबद्दल समजुया..

१) JEE (Joint Entrance Examination) ही इंजिनियरिंगसाठीची प्रवेश परीक्षा आहे. यामध्ये – JEE Main आणि JEE Advanced असे दोन प्रकार आहेत.

२) ही परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असते. (objective pattern)

३) यासाठी ११वी आणि १२ वी मध्ये (PCM/PCMB )हे विषय असणे गरजेचे आहे.

४) (JEE Main) साठी २ प्रकारचे पेपर असतात. पेपर-१ आणि पेपर-२. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे ते दोन्ही पैकी कोणताही एक पेपर किंवा दोन्ही पेपर निवडू शकतात. पेपर-१ हा (B.E./B.Tech) या कोर्सेससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर आणि पेपर-२ हा (B.Arch & B.Planning)या कोर्सेससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर निवडावा.

५) यासाठी (negative marking system)असते. बरोबर उत्तराला ४ गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तराला १ गुण कापला जातो.

६) २०१९ पासून वर्षातून दोनवेळा, (JEE Main)परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा (National Testing Agency) (NTA) यांच्यावतीने घेतली जाते.

७)(JEE Advanced) परीक्षेसाठी जे विद्यार्थी अर्ज करू इच्छितात त्यांनी (JEE Main) परीक्षा पास होणे आवश्यक आहे.


१) ग्रँट मेडिकल कॉलेज जे जे रुग्णालय

२) सेठ जी एस मेडिकल कॉलेज के ई एम रुग्णालय

३) टोपी वाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय

४) सायन रुग्णालय

५) बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय पुणे.

६) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर

७) घाटी रुग्णालय औरंगाबाद

८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज

९) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे

१०) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबे जोगाई.


नीट ही परीक्षा मुख्य PCB या विषयांवरती असते . त्यात bio ला जास्त गुण असतात . साधारणता प्रत्येकी विषयाचे 30 याप्रमाणे 90 chapter आहेत जे ncert मधून करावेत . प्रथम ncert मधून तो chapter रीड करावा . नंतर youtube च्या मदतीने समजून घ्यावा दोन्ही गोष्टी एका वेळी करू शकता . तसेच वेदांतू , unacademy , gradeup , doutnut इ. अँप्लिकेशन ची मदत घ्यावी . नंतर प्रॅक्टिस साठी MTG चे quetion ans चे बुक्स घ्यावे किंवा ऑनलाईन pdf घेऊन प्रिंट काडून घ्यावी . नंतर त्याची प्रॅक्टिस करा . जर तुम्ही 12 th ला असाल तर 4 month मध्ये 90 chapter होतील आणि 1 ते 2 month प्रॅक्टिस साठी द्यावे अशे नियोजन करा व वेळ द्या . आणि 11th ला असाल तर जसे college मध्ये chapter शिकून होतील ते ncert चे करा व प्रॅक्टिस करा . तसेच मोकटेस्ट देने पण चालू करा थोड्या दिवसानंतर तेही उपयोगी ठरते .

  • 2018 मध्ये NEET क्लिअर केली, तसा वेळ झालाय आता बराच, पण काही गोष्टी सारख्याच राहतात त्यातीलच ही एक गोष्ट….अशे प्रश्न पाठवले की मला माझ्या 2 वर्ष younger self ची आठवण होते….मी जे काही माझ्या तयारी मध्ये केलं ते सांगतो, मला आशा आहे सर्वाना याने फायदा होईल…..
    मुळात उदासीनता आणि Depression या वेगळ्या गोष्टी आहेत, उदासीनता ही तात्कालिक असते तर डिप्रेशन हे Chronic असते, तर नक्की ठरवा काय आहे तर, डिप्रेशन म्हणजे जर काहीच खायची इच्छा होत नसेल, झोप येत नसेल, सतत नकारात्मक विचार मनात येत असतील, एकटं एकटं राहावं वाटत असेल, असे जर काही होत असेल तर सरळ सरळ मानसरोगतज्ञांचा सल्ला घ्या/ आई वडिलांशी बोला, शेअर करत जा…त्याने खूप मदत होईल. आता तुमच्या मूळ प्रश्नाकडे येऊ, म्हणजे उदासनीता कशी घालवायची यावर…..मी खालील गोष्टी माझ्या वेळेस केल्या होत्या.

    १. अतिविचार करू नये :- उदासीनता येण्याचं सर्वात महत्वाचं कारण….खूप विचार नाही करायचा…टेस्ट मध्ये कमी मार्क्स मिळालेत, physics त्रास देतोय, चालत राहतं…..आपण फक्त आपला अभ्यास करत राहायचा…..मला physics बिलकुल यायचं नाही, मी याचा खूप अभ्यास केला आणि 12वीच्या दिवाळी पासून माझं physics इतकं छान झालं की काय सांगू, मी physics वर प्रेम करायला लागलो, तर माझा अनुभव आहे, गोष्टींना वेळ द्या, सतत सराव करत राहा…..हळू हळू विषय सोपे होतील आणि छान गोष्टी व्हायला लागतील.

    २. व्यायाम :- मी ही माझ्या तयारीत केलेली सर्वात मोठी चूक आहे की मी व्यायामकडे दुर्लक्ष केलं….इतकं दुर्लक्ष की 12वी ची JIPMER संपल्यानंतर माझं वजन तब्बल 96 किलो झालं जे मग नंतर खूप मेहनतीने कमी केलं….तर ही चूक कृपया कोणीही करू नका….या काळात इतका अभ्यास करावा लागतो की शरीराकडे ऐन तारुण्यात दुर्लक्ष होत, पण ते टाळा कारण याने वजन एकतर खूप वाढेल नाहीतर खूप कमी होईल (Depends तुम्ही घरी राहता की हॉस्टेल🤣🤣)….व्यायामाने शरीरात serotonin secrete होतं आणि serotonin हे long term आनंद देणारा hormone आहे….आपल्या मेंदु मध्ये BDNF (Brain Derived Neurotropic Factor) जो serotonin Secrete करण्याशी संबधीत असतो त्याच्या कमतरतेमुळे Depression येत असत, त्यामुळे व्यायाम करा, उदासीनता डिप्रेशन जास्त येणार नाही….जास्त शक्य नसेल तर 250 उद्या आणि 5–10 सूर्यनमस्कार इतकं केलं तरी खूप आहे किंवा मग जर youtube लावून 20 मिनिट्स कुठला पण HIIT workout करा….अर्धा तासात होईल आणि शरीर मन फ्रेश राहील…..

    ३. प्राणायाम आणि मेडिटेशन :- तुम्ही नास्तिक असाल तरीही करा, माझा फार चांगला अनुभव आहे याबद्दल….मी काय काय करायचो ते सांगतो विथ लॉजिक…माझं regimen….मी शिकलो होतो शास्त्रशुद्ध, त्यावरून मग मी हा regimen ठरवला….

    कपालभाती :- एका मिनिटात 60 स्ट्रोक अशे 3 vela करा….पूर्ण ताकद आणि स्टॅमिना लावून….कपालभाती ने आपली Core strength वाढते आणि आपण आतून strong होतो….respiratory अँड accesosory respiratory muscles ला खूप छान व्यायाम होतो आणि abdominal core muscles ला पण छान फायदा होतो प्लस सगळं मनातलं overthinking band…म्हणजे आपण meditation साठी रेडी होतो…..कपालभाती नंतर
    भस्त्रिका प्राणायाम :- भस्त्रिका चा main focus हा Lung Capacities वर असतो….भस्त्रिका सतत केल्यास तुमची (IC ie Inspriratory Capacity = TV +IRV) आणि (EC ie Expiratory Capacity =TV + ERV ) वाढते…..हे समजलं नाही तर NCERT 11th Bio Respiratory सिस्टिम बरोबर वाचणे🤣🤣…तर तुमचा Ventilation perfusion छान होतं व उदासीनता जाईल. यानंतर
    अनुलोम विलोम :- अनुलोम विलोम ला संकल्प प्राणायाम म्हणतात…. म्हणजे अनुलोम विलोम करताना डोळे बंद करून शांतपणे संकल्प करायचा….मला XYZ कॉलेज मध्ये जायचंय, त्यासाठी मी खूप अभ्यास करेल आणि आज माझं इतकं target आहे ते पूर्ण करेल असा संकल्प करत अनुलोम विलोम करायचा….नंतर
    डोळे बंद करून आणि कानात बोटं घालून म् असा आवाज करणे, याने पण फोकस वाढतो. नंतर
    5 वेळा ओंकार :- स्ट्रेट फॉरवर्ड आहे, छान शांत वाटतं, फोकस वाढतो….
    हे सगळं करायला 15 मिनिट्स पण लागत नाही वाचायला मोठं वाटलं तरी….प्लीज हे सहा महिने करा आणि मग मला सांगा फरक पडला की नाही तर….पण 6 महिने रोज करणं आवश्यक आहे….पण जर केलं तर मी Gurantee देतो की तुम्ही इतके मानसिक दृष्ट्या कणखर व्हाल की काय सांगावं
    आणि लास्ट…..रात्री झोपताना दिवसाचा बेडवर झोपण्यापूर्वी आढावा घ्यायचा…..स्वतः ला विचारा, आज मी मला स्वतःला न्याय दिला का ? नसेल दिला तर उद्यापासून पूर्ण प्रयत्न करा की तुम्ही तुमचे दिवसातील सगळे टार्गेट पूर्ण कराल कारण माणूस कोणालाही फसवू शकतो पण आपल्या आत्म्याला फसवू शकत नाही…..
  • आणि लास्ट, झोपताना imagination

Leave a comment