motivational blog

अभ्यासाची बैठक क्षमता वाढवण्याची कोणती पद्धत आहे का?

पोमोडोरो पद्धत वापरा.

पोमोडोरो पद्धत मध्ये तुम्ही पूर्णपणे अंतर्मुख होऊन काम करण्याला जास्त प्राधान्य देतात. ह्याची सुरुवात होते २५ मिनिटाचा एक पोमोडोरो आणि मग ५ मिनिटाची विश्रांती. नेमलेल्या २५ मिनिटात आपण पूर्णपणे समरसून काम करावे आणि मन विचलित झाले की स्वतःला सांगावे की आपल्याला जे हव आहे ते हे २५ मिनिट संपल्यावर मी करतो पण आता नाही.

Learn2win

माझ मन विचलित व्हायचं की “ऊठ न काय पुस्तक वाचतोय, ते युटूबवर व्हिडीओ पहा”. मी मनाला म्हणायचो की पाहतो ह्या पोमोडोरो नंतर.

  1. फेयमन मॉडेलनंतर दुसरे जास्त उपयोगी असलेले आणि अभ्यास करण्यात अतिशय उपयुक्त असलेले दुसरे मॉडेल म्हणजे माइंड मॅप (Mind Map)!! फेयमन मॉडेल जसे अभ्यासाला सोप्यात सोप्या भाषेत लिहण्यास प्राधान्य देते अगदी तसेच माइंड मॅप अभ्यासाला सोप्यात सोप्या भाषेत आठवण ठेवायला प्राधान्य देते.
    पूर्वापेक्षित (Prerequisite) अर्थात हे उत्तर नीट समजण्यासाठी काय हवं:

    आपला मेंदू कसा शिकतो हे समजून घेण्याची इच्छा,
    थोडी एकाग्रता,
    नवीन काहीतरी शिकण्याची धमक,
    कल्पकता – Creativity!
    संयम हे उत्तर वाचण्यासाठी!
    पेन, कोरे २-३ कागद आणि ५-६ रंगखडू!!
    जर पूर्वापेक्षित नसतील तर उत्तर काही उपयोगाचे नाही, तुम्ही दुसरी उत्तर पाहू शकतात – हे नका पाहू – तुमचाच वेळ वाया जाईल.

    माइंड मॅप म्हणजे काय?

    माइंड मॅप म्हणजे त्याच्या शब्दावरून समजले असेलच की नेमकं काय येईल त्यात!

    माइंड मॅप = माइंड (Mind) + मॅप (Map), अर्थात आपला मेंदू शिकलेल्या गोष्टींना कसा रचून (Mapping) करून ठेवतो त्यानुसार त्याला माहिती पुरवणे.

    माइंड मॅप एक मेंटल मॉडेल आहे ज्याचा वापर करून केलेला अभ्यास दीर्घकाळ आठवण ठेवू शकतो – एखादा खूप मोठा टोपिक खूप चांगल्याप्रकारे माइंड मॅपद्वारे समजून घेता येतो, माइंड मॅपमुळे जास्तीतजास्त माहिती खूप प्रभावीरीत्या लक्षात राहते.

    काही अतिमहत्त्वाचे निरक्षणे मेंदूबद्दल पहिले पाहून घेऊया. म्हणजे आपण पुढे काय? कशासाठी? करतोय त्याला एक पार्श्वभूमी मिळेल.

    आपला मेंदू, आपली मेमरी माहिती ही चित्राच्या स्वरुपात (In Picture) साठवून ठेवते किंवा ती कमीतकमी आपल्याला चित्राच्या स्वरुपात आठवते.
    आपला मेंदू सगळी माहिती शृंखलेच्या (In Sequence) स्वरुपात लक्षात ठेवतो – शिकतो. जसे समुद्राचा रंग निळा असतो – आकाशाचा रंग पण निळा असतो म्हणजे दोघांचा रंग सारखा असतो. नंतर कधी शुभ्र निळा रंग पाहिला असता आपल्याला समुद्र आठवतो.
    आपल्या मेंदूला खूप ठराविक आणि सुटसुटीत माहिती (In Small Separate Parts) साठवणे – आठवणे जास्त सोयीस्कर असते.
    आता मेंदूचे हे तीन “In’s” ला लक्षात घेऊन आपण माइंड मॅप बनवतो.

    माइंड मॅप कसा बनवतात? कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?

    मी तुम्हाला इथे माइंड मॅप बनवण्याची Standard पद्धत सांगतो जी खूप सोप्पी आहे.

    पायरी १ :

    एक मोठा कागद घेऊन ज्या टोपिकबद्दल तुम्हाला माइंड मॅप बनवायचे आहे त्याला कागदाच्या मध्यभागी लिहा.

    पायरी २ :

    आता त्या मध्यभागी असलेल्या टोपिकबद्दल त्याचे तुम्हाला जेवढे अंग (भाग – पार्ट – सबटोपिक्स) लक्षात येतील ते त्या लिहलेल्या टोपिकमधून वाकड्यातिकड्या रेषा काढून बनवा. (नसेल समजले तर आपण खाली उदाहरण पाहूया) सोबत सोबत त्या सबटोपिकच्या अर्थानुसार रंग द्या किंवा लहान कार्टून काढू शकतात.

    पायरी ३ :

    आता पहिल्या पायरीत जसे केले की महत्वाच्या टोपिकमधून रेषा ओढून दुसरे सबटोपिक्स बनवलेत तसे आता नवीन काढलेल्या सबटोपिक्समधून रेषा काढून परत त्यांचे इतर भाग बनवा. सोबत ठराविक माहिती लिहित चला.

    थोडा गोंधळ झाला का? माझातरी लिहतांना झाला आहे. आपण सरळ उदाहरण पाहूया न!!

    वेल, पण त्याअगोदर आपल्याला माइंड मॅप काढण्याचे अतिमहत्त्वाचे सहा C’s लक्षात ठेवावे लागतील.

    पहिला C : (Central Idea)

    हो, ज्याबद्दल आपल्याला माइंड मॅप बनवायचा आहे त्याला इथे Central Idea म्हटले आहे. ही Idea अगदी मध्यभागी लिहावी.

    दुसरा C : (Conciseness)

    ज्या रेषा आपण टोपिक आणि त्याच्या सबटोपिक मधून काढू त्यांच्यावर ठराविकपणे माहिती – शब्द लिहावे – अगदी मोजक्या शब्दांत!

    तिसरा C : (Craziness)

    हो; माइंड मॅप बनवतांना त्याला जेवढे नवीन – आगळेवेगळे बनवता येईल तेवढे बनवावे. जेवढा पागलपणा त्यात तुम्हाला टाकता येईल तेवढा टाकावा कारण आपल्या मेंदूला असच आवडत.

    चौथा C : (Curves)

    मी सुरवातीपासून म्हणतोय की रेषा वाकड्यातिकड्या काढा त्याचे कारण असे की आपला मेंदू खूप प्रेसिशन (अचूकतेने) काम करत नाही – आपले अक्षर वाकडीतिकडी असतात – चित्रे एकदम रेषेत नसतात अगदी तसेच जेवढे वाकडेतिकडे चित्रे – रेषा जमतील तेवढे काढा!

    पाचवा C : (Colours)

    आपल्या मेंदूला रंग खूप आवडतात. लहान मुलांचे चित्रे आपण पाहिली असणारच!! किती रंग ते अस्ताव्यस्त भरून ठेवतात – असाच आपला मेंदू करतो कारण त्याला रंग खूप आवडतात – आपणसुद्धा तसेच करू – खूप रंग वापरू!!

    शेवटचा अर्थात सहावा C : (Cartoons)

    जमतील तेवढे लहान कार्टून्स – डूडल्स काढावेत जेणेकरून मेंदूला लिहलेली माहिती चित्राच्या स्वरुपात लक्षात ठेवायला अजून सोप्पी जाईल.

    तर मग चला आता ह्या सहा C’s ला लक्षात घेऊन आपण आपले माइंड मॅप तयार करूया!!

    अभ्यासातले टोपिक न घेता इथे मी ” चहा कसा बनवायचा ” ह्याचा माइंड मॅप दाखवतो – हा टोपिक सगळ्यांना समजायला सोपा आहे आणि मला इथे त्याला दाखवायला ही जमेल.

    मग पेन, पेपर आणि रंग घेतले का???


    चहा ज्याला Central Idea बनवून त्यातून चहा कधी बनवायचा?, कसा बनवायचा?, कोणासाठी?, कसा? ह्यासारखी सबटोपिक्स बनवायचे. त्यांच्यासाठी चहा टोपिकमधून वाकड्यातिकड्या रेषा काढायच्या. लक्षात घ्या इथे आपण Central Idea – Colours – Curves – Conciseness असे C’s वापरतोय.

    आता ह्यावरच आपण कोणत्याही एका रेषेला पुढे वाढवू अगदी पाहिल्यासारखे!!


    इथे मी तुम्हाला “साहित्य” ह्या रेषेला वाढवून दाखवले आहे. चहा बनवायला काय साहित्य लागते त्याला मी दोन शाखेत विभागले आहे – एक भांडे आणि दुसरे चहातील पदार्थ!!! पुन्हा ह्याच शाखांना अजून विभागणी करून मांडले आहे. चहासाठी भांडे – मग गाळणी मग शेगडी तर पदार्थात इलायची – साखर – दुध – गवती चहा इत्यादी. इथे Cartoons – Curves असे C’s इतर C’s सोबत घेतलेय. बघा हे कसं सुटसुटीत -समजायला सोप्प – पाहायला भारी वाटतेय.

    आता अशाच प्रकारे आपण इतर चहाचे सबटोपिक्स वाढवूया!!


    इथे मी चहा कधी बनवावी? आणि का बनवावी ह्या दोन शाखांना वाढवले आहे. चहा कधी घ्यायचा तर सकाळी आणि संध्याकाळी शिवाय का बऱ घ्यायचा तर अंगात उर्जा यायला आणि जर ब्रेक घेतला असेल तर !!


    बाकी शाखा तुम्ही वाढवा, मी इथे चहा कोणासाठी बनवावा ही शाखा बनवली आहे – घरच्यांसाठी आणि मित्रांसाठी असे!!

    बस हीच प्रकिया पुढे पुढे चालू ठरवायची!! ह्या माइंड मॅपचे निरीक्षण करा – पाहायला छान – आठवण ठेवायला सोप्पा आहे. हा लगेच लक्षात पण राहील!!!

    असेच सगळ्या टोपिक्सचे लहान मोठे माइंड मॅप बनवून ते पाहत राहायचे – आत्मसात करायचे. मग परीक्षेत उत्तर लिहायला सोपी जातात कारण ह्यांना आठवून आपण त्यानुसार १०-२० वाक्यात सहज माहिती लिहू शकतो!!

    खाली अजून अशीच काही माइंड मॅप आपण पाहूया!! (जी मी काढली नाहीये!!)



    अभ्यास कसा करायचा ह्याबाबती हा माइंड मॅप!! फोटो स्त्रोत [1]


    माइंड मॅप चे फायदे काय? हा मेंटल मॉडेल का यशस्वी होतो?

    आपला मेंदू काम करतो त्या तीन In’s ला माइंड मॅप खतपाणी पुरवतो. In Picture – In Sequence – In smaller Part.. माहिती ही चित्रात – शृंखलेत आणि लहान भागात असल्यामुळे लवकर लक्षात येते आणि मेंदूचे लकवर लक्ष वेधून घेते परिणामी आपली आठवण ठेवण्याची क्षमता वाढते – Creativity वाढते.

    फेयमन मॉडेल आपण काय शिकलोय ह्याला सोप्या भाषेत – एका सहावीच्या मुलाला आपण समजून सांगतोय ह्या अनुषंगाने लिहतात तर माइंड मॅप आपण काय शिकले आहोत त्याला मस्त रंगबिरंगी चित्रांद्वारे मांडतो.

    फेयमन मॉडेलसाठी हे उत्तर पाहावे.

    फेयमन टेक्निक काय आहे? तिचा उपयोग कोठे होतो? चे कमलाकर विजय ठाकरे (Kamalakar Vijay Thakare)ने दिलेले उत्तर

    शिवाय, ह्याच माइंड मॅपवरचे हे मयुर सोनवणे (Mayur Sonawane) ह्यांचे एक मस्त उत्तरही वाचावे म्हणजे माइंड मॅप ही भानगडच मिटेल.

    माहिती संदर्भ :

    १. Ready Study Go! – खुर्शेद बाटलीवाला आणि दिनेश घोडके

    २. How To Memorize Anything – आदिती आणि सुधीर सिंघाल

    ३. The Great Mental Models Volume 1 – शेन पेरीश

    ४. Super Thinking – गेब्रीअल वेन्बर्ग आणि लौरेन मेकन

    हाथ स्वच्छ धुवा – गरजूंना पाणी आणि एका वेळेचे जेवण दिले तरी खूप छान होईल. मनात भीती नका ठेवू आणि शासनाला कोरोना प्रतिबंध करण्यासाठी “घरातच थांबून” उत्तम प्रतिसाद देवूया.

    एकूण उत्तर लिखाणाची वेळ :

    ४ तास ३३ मिनिटे!! 😚😋😍

    तळटीपा

    [1] Revision Tips | Revision tips, Exam revision, School study tips
    मित्रा अतिशय महत्वाचा प्रश्न केलात.

    🙏 Tushar Bhagade

    माईड मँप- माझ्या मते वास्तविक जिवनात निर्णय करतांना भावनात्मक हरडल थेरी नकळत आपला रोल प्ले करते, व सारख काम किवा अभ्यास काही वेळे साठी पोस्टपोन्ड करते, याच नियंत्रन करने साठी आँब्जेक्टीव्ह बेस असलेली माईड मँप पध्दत सहाय्यक ठरते.
    या साठी क्रुपया श्री अभ्यास करण्याकरता माईंड मॅप पद्धत वापरतात त्याबद्दल काही सांगू शकाल का? चे कमलाकर विजय ठाकरे (Phunsukh Wangdu)ने दिलेले उत्तर साठी आदर्श उत्तर दिल आहे.
    सब्जेक्टीव्ह (व्हिव्ह) हे जस भावना किंवा कल्पना चित्रा नुसार रंगवल्या जातात. उदा. पोटातील पाच अवयव पार्ट कसे दिसतात हे जो पर्यत एखाद पोट फाडून बघीतल तरच नीहीतर त्याची तूलना वेगवेगळी फळभाजी किंवा फळा सोबत व्हायची. ईथ माझे सारखे मानसीक गरीबीमुळे वस्तू फळ बघितलेच नसतिल तर मन मस्त भटकने चालू व्हायचे व अभ्यास कधीच होत नव्हता परीनाम विषयांतर.
    अभ्यास करतांना प्रत्येक पँरीग्राम मध्ये एक हिडन वार्नीग किंवा आँब्जेक्शन असते (जो कायम अस्पष्ट असते), उदा. समजा तूमची लव्हर आज बाहेर गावी गेली आता तूम्ही तिच्या घरा जवळ चक्कर मारनार नाही. तिचे पप्पा घरीअसले तर थोड मानुस्कीत नाहीतर कार्यक्रम जुटायच्या आधिच तूटायची प्रोसेस चालू हे सर्व माईंन्ड कस मँप करते ते समजुन घेवू.
    Step 1- ईथ तुम्ही आधीच एक निकष आँब्जेक्ट लव्हर माईड मध्ये मँप केला म्हनजे अबसेट/ प्रेझेंन्ट असल्याच कनफर्म केल.
    Step 2- तसच अभ्यास/काम करतांना आपले बेसीक फंडामेंटल अतिशय स्पष्ट पाहीजेत, A=पुर्वी झालेल उपलब्ध काम, व B= आज करायचे बदल, या दोन बिंन्दू खुप स्पष्ट असले तर जो गँप/तफावत आहे तेच आपल आजच आँबजेक्ट व टारगेट.
    Step- 3 उपरोक्त टारगेट वर कोनत्या बाबी परीनाम करतात त्यानुसार त्याची उपविभागनी करन्यात येते. त्यातला प्रत्येक निकष ने आपल्या existance उपस्थीत असल्याचा संकेत कनफर्म केला व दिवसातील वेळेनुसार बदल स्पष्ट जानवला व त्याची जानिवपुर्वक नोंद घेतली तरच आजच्या कामात/अभ्यासाला गती येते.
    दूसर कोनीपन असल तरी या स्टेप बदलनार नाही या साठी माईंन्ड मँप करून सेट करन महत्वाच ठरत.

Leave a comment